शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून त्यावर आपली विचार शक्ती तसेच सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून तसेच उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा वापर करून मुद्देसूद विषयाची मांडणी करून तयार केलेला उपक्रम म्हणजे ‘प्रकल्प’ होय.
👉 प्रकल्पाची उद्दिष्टे:
स्वयंअध्ययनाची आवड निर्माण करणे.स्वतःमध्ये असणाऱ्या निरीक्षणवृत्ती, संकलन, कल्पकता, निवेदन, संघभावना, सौंदर्य दृष्टी आणि सादरीकरण इत्यादी गुणांचा विकास करणे.तर्कसंगत विचार करणे व अनुमान मांडणे.स्वतःमध्ये (विद्यार्थ्यांमध्ये) आत्मविश्वास निर्माण करणे.याव्यतिरिक्त निवडलेल्या विषयाचा तर्कसंगत विचार आणि अभ्यास करून, संघभावना जोपासून, प्रकल्प तयार करणे.
👉 प्रकल्प लेखन कसे कराल?
प्रकल्प करणे जितके महत्वाचे आहे तितकेच प्रकल्पाचे सुयोग्य आणि मुद्देसूद लेखन सुद्धा महत्वाचे आहे. कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप येणार आहेत.
👉 शालेय प्रकल्प (प्रकल्प) लेखन कसे करावे तसेच अनुक्रमणिका कशी असावी या बाबत मार्गदर्शन आपण पुढील लेखात पाहणार आहोत –
प्रकल्पाचे नाव (विषयासह) –निवडलेल्या विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प तसेच पर्र्यावरण प्रकल्प.प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची उद्दिष्टे लिहा.प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाचा हेतू स्पष्टपणे मांडा.प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. संदर्भसाहित्याची नोंद करा.आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पुर्ण करताना मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.
शालेय प्रकल्पांसाठी यादी :
1. माहिती संकलन –
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह –
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, नोटा व नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन –
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते-
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.
5. आदर्श –
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.