प्रकल्प म्हणजे काय? What Is Project?

Table of Contents

प्रकल्प म्हणजे काय? What Is Project?

शालेय अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून त्यावर आपली विचार शक्ती तसेच सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून तसेच उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा वापर करून मुद्देसूद विषयाची मांडणी करून तयार केलेला उपक्रम म्हणजे ‘प्रकल्प’ होय.

👉 प्रकल्पाची उद्दिष्टे:

स्वयंअध्ययनाची आवड निर्माण करणे.स्वतःमध्ये असणाऱ्या निरीक्षणवृत्ती, संकलन, कल्पकता, निवेदन, संघभावना, सौंदर्य दृष्टी आणि सादरीकरण इत्यादी गुणांचा विकास करणे.तर्कसंगत विचार करणे व अनुमान मांडणे.स्वतःमध्ये (विद्यार्थ्यांमध्ये) आत्मविश्वास निर्माण करणे.याव्यतिरिक्त निवडलेल्या विषयाचा तर्कसंगत विचार आणि अभ्यास करून, संघभावना जोपासून, प्रकल्प तयार करणे.

👉 प्रकल्प लेखन कसे कराल?

प्रकल्प करणे जितके महत्वाचे आहे तितकेच प्रकल्पाचे सुयोग्य आणि मुद्देसूद लेखन सुद्धा महत्वाचे आहे. कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप येणार आहेत.
👉 शालेय प्रकल्प (प्रकल्प) लेखन कसे करावे तसेच अनुक्रमणिका कशी असावी या बाबत मार्गदर्शन आपण पुढील लेखात पाहणार आहोत –
प्रकल्पाचे नाव (विषयासह) –निवडलेल्या विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प तसेच पर्र्यावरण प्रकल्प.प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची उद्दिष्टे लिहा.प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाचा हेतू स्पष्टपणे मांडा.प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. संदर्भसाहित्याची नोंद करा.आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पुर्ण करताना मिळालेल्या अनुभवांचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.

 शालेय प्रकल्पांसाठी यादी :

विज्ञान / Science Projects

  • Artificial Intelligence Project | कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प
  • Robotics Project | रोबोटिक्स प्रकल्प
  • Solar Energy Project | सौर ऊर्जा प्रकल्प
  • Water Conservation Project | जलसंवर्धन प्रकल्प
  • Rainwater Harvesting Project | पावसाचे पाणी साठवण प्रकल्प
  • Plastic Pollution Project | प्लास्टिक प्रदूषण प्रकल्प
  • Smart Farming Project | आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प
  • Organic Farming Project | सेंद्रिय शेती प्रकल्प
  • Climate Change Project | हवामान बदल प्रकल्प
  • Global Warming Project | जागतिक तापमानवाढ प्रकल्प
  • Pollution Control Project | प्रदूषण नियंत्रण प्रकल्प
  • Waste Management Project | कचरा व्यवस्थापन प्रकल्प
  • Eco-Friendly Village Project | पर्यावरणपूरक गाव प्रकल्प
  • Smart City Project | स्मार्ट सिटी प्रकल्प
  • Electric Vehicle Project | इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प
  • Hydrogen Energy Project | हायड्रोजन ऊर्जा प्रकल्प
  • Biotechnology Project | जैवतंत्रज्ञान प्रकल्प
  • Space Science Project | अंतराळ विज्ञान प्रकल्प
  • Drone Technology Project | ड्रोन तंत्रज्ञान प्रकल्प
  • AI in Education Project | शिक्षणातील AI प्रकल्प

Computer / IT Projects

  • Cyber Security Project | सायबर सुरक्षा प्रकल्प
  • Digital India Project | डिजिटल इंडिया प्रकल्प
  • Blockchain Technology Project | ब्लॉकचेन तंत्रज्ञान प्रकल्प
  • Cloud Computing Project | क्लाऊड कम्प्युटिंग प्रकल्प
  • Internet of Things (IoT) Project | इंटरनेट ऑफ थिंग्स प्रकल्प
  • Coding & Programming Project | कोडिंग प्रकल्प
  • Social Media Impact Project | सोशल मीडिया प्रभाव प्रकल्प
  • Online Education Project | ऑनलाइन शिक्षण प्रकल्प
  • Mobile Addiction Project | मोबाईल व्यसन प्रकल्प
  • E-Waste Management Project | ई-कचरा व्यवस्थापन प्रकल्प
  • Digital Payment System Project | डिजिटल पेमेंट प्रकल्प
  • Data Privacy Project | डेटा गोपनीयता प्रकल्प
  • Smart Classroom Project | स्मार्ट वर्ग प्रकल्प
  • Ethical Hacking Project | एथिकल हॅकिंग प्रकल्प
  • Future Technology Project | भविष्यातील तंत्रज्ञान प्रकल्प

Social & Awareness Projects

  • Women Empowerment Project | महिला सक्षमीकरण प्रकल्प
  • Save Environment Project | पर्यावरण संरक्षण प्रकल्प
  • Save Water Save Life Project | पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प
  • Tree Plantation Project | वृक्षारोपण प्रकल्प
  • Clean India Mission Project | स्वच्छ भारत अभियान प्रकल्प
  • Road Safety Project | रस्ता सुरक्षा प्रकल्प
  • Drug Addiction Awareness Project | व्यसनमुक्ती प्रकल्प
  • Health & Hygiene Project | आरोग्य आणि स्वच्छता प्रकल्प
  • Mental Health Awareness Project | मानसिक आरोग्य प्रकल्प
  • Child Labour Project | बालमजुरी प्रकल्प
  • Human Rights Project | मानवाधिकार प्रकल्प
  • Rural Development Project | ग्रामीण विकास प्रकल्प
  • Traffic Management Project | वाहतूक व्यवस्थापन प्रकल्प
  • Population Growth Project | लोकसंख्या वाढ प्रकल्प
  • Water Pollution Project | जलप्रदूषण प्रकल्प

History / Marathi Culture Projects

  • Chhatrapati Shivaji Maharaj Project | छत्रपती शिवाजी महाराज प्रकल्प
  • Maharashtra Culture Project | महाराष्ट्र संस्कृती प्रकल्प
  • Marathi Language Project | मराठी भाषा प्रकल्प
  • Forts of Maharashtra Project | महाराष्ट्रातील किल्ले प्रकल्प
  • Freedom Fighters Project | स्वातंत्र्यसैनिक प्रकल्प
  • Indian Constitution Project | भारतीय संविधान प्रकल्प
  • Indian Army Project | भारतीय सैन्य प्रकल्प
  • Indian Festivals Project | भारतीय सण प्रकल्प
  • Folk Art of Maharashtra Project | महाराष्ट्र लोककला प्रकल्प
  • Saint Tradition Project | संत परंपरा प्रकल्प

Commerce / Economics Projects

  • Startup India Project | स्टार्टअप इंडिया प्रकल्प
  • Financial Literacy Project | आर्थिक साक्षरता प्रकल्प
  • Banking System Project | बँकिंग व्यवस्था प्रकल्प
  • Cryptocurrency Project | क्रिप्टोकरन्सी प्रकल्प
  • Stock Market Project | शेअर मार्केट प्रकल्प
  • Entrepreneurship Project | उद्योजकता प्रकल्प
  • Make in India Project | मेक इन इंडिया प्रकल्प
  • Cashless Economy Project | कॅशलेस इकॉनॉमी प्रकल्प
  • Consumer Awareness Project | ग्राहक जागरूकता प्रकल्प
  • Business Ethics Project | व्यावसायिक नैतिकता प्रकल्प

Agriculture & Village Based Projects

  • Dairy Farming Project | दुग्ध व्यवसाय प्रकल्प
  • Poultry Farming Project | कुक्कुटपालन प्रकल्प
  • Fish Farming Project | मत्स्यपालन प्रकल्प
  • Drip Irrigation Project | ठिबक सिंचन प्रकल्प
  • Vermicompost Project | गांडूळ खत प्रकल्प
  • Beekeeping Project | मधमाशी पालन प्रकल्प
  • Agri Technology Project | कृषी तंत्रज्ञान प्रकल्प
  • Farmer Problems Project | शेतकरी समस्या प्रकल्प
  • Organic Fertilizer Project | सेंद्रिय खत प्रकल्प
  • Sustainable Agriculture Project | शाश्वत शेती प्रकल्प

1. माहिती संकलन –

थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, समाजसेविका इत्यादी.

2. संग्रह –

म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, नोटा व नाणी संग्रह इत्यादी.

3. प्रदर्शन –

चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.

4. तक्ते-

शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.

5. आदर्श –  

आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

Scroll to Top